पुणे : दीड महिन्यांपूर्वी वाहतुकीचे नियमन करत असताना पोलिस अंमलदार यांनी ट्रिपल जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होती. यावेळी पोलीस आणि आरोपी यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. या कारवाईचा राग मनात धरून पोलीस अंमलदाराच्या डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार काल रात्री (25 ऑक्टोबर) पुण्यात घडला आहे.
आर्मी जवानाने पोलिसाच्या डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक घातल्याची घटना घडली. यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ घडली. रमेश ढावरे असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे तर वैभव संभाजी मनगटे असं आर्मी जवानाचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
ढावरे यांनी दीड महिन्यापूर्वी आरोपीवर दंडाची कारवाई केली होती. ट्रिपल सिट गाडी चालवल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी वैभव मनगटे याने बाचाबाचीचा राग मनात धरुन त्याने बदला घेण्याच्या उद्देशाने रमेश ढावरे यांचा शोध घेतला. बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ढावरे हे बुधवार चौकात वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला. त्याने ढावरे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने सिमेंटचा ब्लॉक ढारे यांच्या डोक्यात जोरात मारला. यामध्ये ढावरे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.