पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी ड्युटीवर असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या लोहियानगर पोलीस चौकीमध्ये भारत दत्ता अस्मार हे पोलीस कर्मचारी कार्यरत होते. त्यांनी आज लोहियानगर पोलीस चौकीच्या रेस्ट रूममध्ये स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या आहेत. यावेळी भारत अस्मार यांनी सीआर मोबाईल वन वरील कार्बाईनने स्वतःवर चार राऊंड फायर करून आत्महत्या केली आहे.

त्यांनी आत्महत्या नेमकी का केली याचा कारण अद्याप स्पष्ट समजू शकलो नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली आहे अधिक तपास सुरू आहे.