नवी दिल्ली : आजकाल फोन हा खरंतर प्रत्येकाचा ऑक्सिजन मास्क झाला आहे. अगदी दोन-तीन वर्षाच्या लहानग्या मुलांपासून वयस्कर लोकांच्या हातात मोबाईल फोन हा असतोच अशी परिस्थिती सध्या झाली आहे. कोणत्याही वस्तूचा योग्य वापरून आवश्यक आहे. मोबाईल फोनचा जेवढा चांगला उपयोग होऊ शकतो तितकाच घातक देखील तो ठरतो आहे. दिल्लीमध्ये असंच काहीसं घडलं, या घटनेतील आईने तिच्या मुलीचा मोबाईल चेक केला. यावेळी स्नॅपचॅटमध्ये तिचे फोटो पाहून आईच्या पायाखालची अक्षरशः जमीनच सरकली.
या मुलीच्या स्नॅपचॅटमध्ये तिचे अश्लील फोटो आईला दिसून आले. हे फोटो पाहून आई प्रचंड संतापली. पण मुलीचं वय पाहता आईने संयमानं घेतलं. त्यानंतर आईने तात्काळ या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार केली आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी 27 वर्षीय सुभान अली यास उत्तराखंड मधून अटक देखील केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीने या अल्पवयीन मुलीला फूस लावून ट्रुथ अँड डेअर खेळण्याच्या नावाखाली या मुलीचे अश्लील फोटो तिच्याकडून काढून घेतले होते. याप्रकरणी पोलिसांनी POCSO अंतर्गत 354 आयपीसी या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
अरे बापरे ! 22 आमदार शरद पवारांकडे घर वापसी करणार ? नेमकं काय म्हणाले रोहित पवार, वाचा सविस्तर