पुणे : कपिल शर्माच्या Kapil Sharma या प्रसिद्ध विनोदी अभिनेता आणि निवेदकाच्या नावाने पुण्यातील महिलेला वारंवार फोन Fake Call केला जात होता. इतकेच नाही, तर तो व्यक्ती त्या महिलेसोबत अश्लील भाषेत बोलत होता. अखेर या महिलेने सततच्या फोनला कंटाळून पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पुण्यामध्ये बुधवारी 22 नोव्हेंबर 2023 दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडला. येरवाडा पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केलाय.
हे वाचलेत का ? …तर असा आहे शाहरुख खानच्या ‘DUNKY’ चित्रपटाचा अर्थ, अखेर अभिनेत्याने दूर केला हा संभ्रम
कल्याणीनगर येथे महिला कार्यरत असताना दुपारच्या सुमार तिला अनोळखी क्रमांकावरुन वारंवार फोन येत होता. या फोनवरुन तो व्यक्ती अश्लील भाषेत बोलत होता. तो स्वत:ला कपिल शर्मा असल्याचे सांगत महिलेला अश्लील भाषेत बोलत होता. आरोपी व्यक्तीने तिच्या मोबाईलवर दहा ते 12 वेळा फोन केला. ‘मै कपिल शर्मा बात कर रहा हूँ, पहचाना नही क्या? उस दिन तो नाईट को ओयो हॉटेल में मिले थे, दीपक है क्या?’ असे बोलून मानसिक त्रास दिला. चिडलेल्या महिलेने तो क्रमांक ब्लॉक केला, अन् थेट पोलीस स्टेशन गाठले. महिलेला मानसिक त्रास सहन करावा लागला, तो व्यक्ती वारंवार अश्लील भाषेत बोलत होता, त्याचा महिलेला मनस्ताप झाला. 27 वर्षीय महिलेने थेट पोलिसांत याबाबत तक्रार दिली. 354, 354 ड, 504, 509 नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गायकवाड (PSI Gaikwad) करत आहेत.
अर्थातच हा एखाद्या विकृताचा मानसिक त्रास देण्यासाठीच कावा असणार हे नक्की, लवकरच याचा खुलासा होईलच.