नाशिक : २७ सप्टेंबर रोजी नाशिक मधील नांदगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मन्याड फाटा या ठिकाणी एका दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये विवाहित डॉक्टर युवतीचा मृत्यू झाला. या विवाहितेच्या अचानक मृत्यू मुळे तिच्या माहेरी आणि सासरी दुःखाचा डोंगर कोसळला. पण पुढच्या १५ दिवसात पोलिसांनी केलेल्या तपासात जे उघडकीस आले त्याने तिच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली.
या अपघाताचा बनाव दुसर तिसरे कोणी नाही तर खुद्द तिच्या पती आणि सासऱ्यानीच रचला होता. कारण होते ते पैशांचे… मयत विवाहितेचा पती हा देखील डॉकटर आहे. डॉ. किशोर शेवाळे याची पत्नी डॉ. भाग्यश्री यांच्याकडून पैशांची मागणी करत होता. दवाखाना बांधण्यासाठी २५ लाख रुपये माहेरहून घेऊन यावेत अशी मागणी तो सातत्याने करत होता. पण भाग्यश्री काही केल्या पैसे आणायला टायर होत नव्हत्या. त्यानंतर पती किशोर शेवाळे आणि त्याचे वडील नंदू राघो शेवाळे या दोघांनी संगनमत करून भाग्यश्रीची हत्या करून अपघाताचा बनाव रचला.
दरम्यान मयत भाग्यश्री यांच्या भावाने पोलिसात या दोघांविषयी तक्रार केल्याने पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली. आणि अवघ्या १५ दिवसात या पिता पुत्राचा खरा चेहरा समोर आला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.