• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

Mission E-Security : महिलांनी न घाबरता Cyber Trolling ला सामोरे जाऊन प्रतिकार करावा; विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन

Web Team by Web Team
December 14, 2023
in Crime, मुख्य बातम्या
0
Mission E-Security : महिलांनी न घाबरता Cyber Trolling ला सामोरे जाऊन प्रतिकार करावा; विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागपूर : सोशल मीडिया Social Media सध्या अनेकांना पैसे देखील मिळवून देण्याचे प्रमुख साधन बनले आहे. पण याच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण प्रसिद्ध होतात तर अनेक जण बदनाम देखील होत आहेत. मुद्दाम बदनामी करण्याच्या हेतूने अनेक जण सोशल मीडियावरील फोटोचा गैरउपयोग करत असल्याचे निष्पन्न झाल्या नंतर सायबर सुरक्षित करणारा ‘मिशन ई-सुरक्षा’ Mission E-Security या कार्यक्रमाचे आयोजन विधिमंडळामध्ये राज्य महिला आयोग, उपसभापती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले होते.

सोशल मीडियावर महिलांचे खच्चीकरण करण्यासाठी ट्रोलिंगची पद्धत आली आहे, मात्र महिलांनी कोणत्याही प्रकारच्या ट्रोलिंगला न घाबरता सामोरे जावून प्रतिकार करण्याचे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या कि , सोशल मीडियाचा वापर प्रचार, प्रसिद्धी आणि चांगल्या कामासाठी होण्याऐवजी त्याचा गैरवापर वाढत आहे. सोशल मीडिया आपली प्रत्येक हालचाल टिपत असतो. या माध्यमातून सायबर क्राईममध्ये वाढ होवू लागली आहे, याचे बळी पुरूषांसोबत महिला जास्त प्रमाणात पडत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांच्या छळांचे प्रमाण वाढत आहे. पुरूषांच्या वाईट नजरा, कामाच्या ठिकाणी विविध प्रकारचा लैंगिक छळ याबाबत आलेल्या कायद्याचा महिलांनी वापर करावा. महिला लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील सायबर क्राईमबाबत आवाज उठविणे आवश्यक असून सायबर क्राईम पोलीस स्टेशनमध्ये काम कसे चालते याची माहिती घ्यावी. प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला तक्रार समित्या असून याचा आढावा कोणी घ्यावा, याबाबत स्पष्टता नसल्याने बैठका होत नाहीत, यावरही आवाज उठविला जावा. महिलांच्या छळवणूक, तक्रारीचा प्रत्येक विभागाचा अहवाल महिला व बालविकास विभागाकडे येत असल्याने या विभागाचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे. या विभागासाठी असणारा निधी, पदांची शासनाने दखल घ्यावी.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

संसदेप्रमाणे महिलांनी प्रत्येक गावातील अडचणी सोडविण्यासाठी 33 टक्के महिला आणि 33 टक्के अधिकाऱ्यांनी मिळून बैठका घेवून महिलांच्या समस्या, अडचणी सोडविणे आवश्यक आहे. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात पोलीस महानिरीक्षक, महिला आमदार, महिला आयोग सदस्य यांचीही बैठक घेवून महिलांच्या समस्या सोडविताना येणाऱ्या अडचणीविषयी चर्चा करून सोडवणूक करण्याचे आवाहनही डॉ. गोऱ्हे यांनी केले.
ग्रामीण आणि शहरी भागातील सायबर क्राईमबाबत महिलांच्या तक्रारी येतात, मात्र पुरावा मिळत नसल्याने आरोपी सापडत नाही, अशावेळी सायबर तज्ज्ञांची मदत घेवून अशा तक्रारींचा निपटारा करणे शक्य होणार आहे. महिलांनी अश्लिल संदेश, घाणेरडे बोलणे याबाबत 112 नंबरवर तक्रार करता येते, अशावेळी पोलिसांची मदत घेणे हिताचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, सोशल मीडियाचा प्रचाराचे प्रभावी माध्यम आहे पण जपून वापर करावा. सध्या प्रचार, प्रसाराची माध्यमे बदलली आहेत. आपले काम जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध माध्यम आली आहेत. सोशल मीडिया प्रचार, प्रसिद्धीसाठी प्रभावी माध्यम असून याचा महिलांनी जपून वापर करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री कुमारी तटकरे यांनी केले. सोशल मीडियाचे खाते हॅक होणे, अश्लिल कमेंट, योग्य की अयोग्य याबाबत सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्यावी, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याची आवश्यकता आहे. याबाबत शासन योग्य दखल घेणार आहे. महिलांनी डीप फेक व्हिडीओ, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) याबाबत सायबर तज्ज्ञाकडून जाणून घेवून सावधानता बाळगणे आवश्यक आहे. महिलांच्या सायबर सुरक्षेसाठी महिला आयोग, उपसभापती कार्यालयाच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

MURDER CASE : भयानक ! जमिनीच्या किरकोळ तुकड्यासाठी काकाचे शिर केले धडा वेगळे ! शीर दुचाकीवरून घेऊन फिरताना पुतण्याला अटक, सोलापुरात खळबळ

प्रास्ताविकात श्रीमती चाकणकर यांनी महिला आयोग महिलांची सुरक्षा, अडचणी, समस्या कशा पद्धतीने सोडविते याबाबतची माहिती दिली. महिलांच्या सायबर क्राईमच्या तक्रारी वाढत असून याला आळा घालण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत आवश्यक आहे. सायबरमध्ये गुन्हेगारी वाढत असून त्याच्या सुरक्षेबाबत राज्यभर महिलांसाठी कार्यक्रम घेणार आहे. मानवी तस्करीचा विळखा दूर करण्यासाठीही महिला आयोग काम करणार असल्याचेही श्रीमती चाकणकर यांनी सांगितले.

सायबर तज्ज्ञ संदीप गादिया यांनी सायबर गुन्हेगारीबाबत विस्तृत माहिती दिली. मोबाईल हा आपला डिटेक्टिव्ह असून सर्व हालचाली तो टिपत असतो. सर्व सोशल मीडियाला तुमची वैयक्तिक माहिती मोबाईलद्वारे होत असते. एकही व्यक्ती सायबर क्राईमपासून वाचू शकत नाही, यासाठी तंत्रज्ञाचा वापर योग्य आणि काळजीपूर्वक करण्याचे आवाहन गादिया यांनी केले.

यावेळी महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सचिव माया पाटोळे यांच्यासह दोन्ही सभागृहातील महिला सदस्या उपस्थित होत्या.

Parliament Building सुरक्षा दलाशी संबंधित 8 कर्मचारी निलंबित; लोकसभा सचिवालयने कारवाई करून सुरक्षा यंत्रणेत केले ‘हे’ मोठे बदल
Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

MURDER CASE : भयानक ! जमिनीच्या किरकोळ तुकड्यासाठी काकाचे शिर केले धडा वेगळे ! शीर दुचाकीवरून घेऊन फिरताना पुतण्याला अटक, सोलापुरात खळबळ

Next Post

Pune Encroachments : अनधिकृत बांधकामे तयार होतानाच थांबवा ! मंत्री उदय सामंत यांचे पुणे महानगरपालिकेला निर्देश

Next Post
Pune Encroachments : अनधिकृत बांधकामे तयार होतानाच थांबवा ! मंत्री उदय सामंत यांचे पुणे महानगरपालिकेला निर्देश

Pune Encroachments : अनधिकृत बांधकामे तयार होतानाच थांबवा ! मंत्री उदय सामंत यांचे पुणे महानगरपालिकेला निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

अरे बापरे ! शिंदे गटातील दोन नेत्यांमध्ये थेट धक्काबुक्की; महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्ये ‘या’ शुल्लक कारणावरून राडा

अरे बापरे ! शिंदे गटातील दोन नेत्यांमध्ये थेट धक्काबुक्की; महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्ये ‘या’ शुल्लक कारणावरून राडा

1 year ago
Polio Sunday ! आपल्या बाळाला 3 मार्चला पोलिओची लस अवश्य द्या ! आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन

Polio Sunday ! आपल्या बाळाला 3 मार्चला पोलिओची लस अवश्य द्या ! आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन

1 year ago
LIFE STYLE : मनातले बोलायला कोणी नसेल तर मानसिक आरोग्यासाठी डायरी लिहिणे हा आहे सर्वोत्तम पर्याय !

LIFE STYLE : मनातले बोलायला कोणी नसेल तर मानसिक आरोग्यासाठी डायरी लिहिणे हा आहे सर्वोत्तम पर्याय !

2 years ago
MPL 2023

MPL 2023 : ईगल नाशिक टायटन्स संघाची विजयी सलामी, अर्शिन कुलकर्णीची अर्धशतकी खेळी

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.