बीड : मनोज जरांगे पाटील यांनी आपल आमरण उपोषण मागे घेतलं. परंतु आपलं आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने सुरूच ठेवल आहे. आज मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये दौऱ्यावर आहेत. दरम्यान बीडमध्ये त्यांच्यावर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. राज्य सरकारने अद्याप देखील यावर निर्णय घेतला नसल्याकारणाने मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्रामध्ये झंजावाती दौरा सुरू आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने त्यांच्यावर एसआयटी चौकशी लावली असून आज बीडमध्ये त्यांच्यावर पुन्हा एकदा एक पुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत विविध ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यावर पाच गुन्हे दाखल झाले आहेत.
बीडमध्ये पोहोचल्यावर रॅली काढून जरांगे पाटील यांच्यावर जेसीबीने फुल उधळण्यात आली. याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यांच्यासह बारा जणांवर देखील हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढत होत असल्याचे दिसून येते आहे.
लोकसभा जागावाटप तिढा : शिंदे-पवार गटाच्या पारड्यात आतापर्यंत जागावाटपासाठी झालेल्या बैठकांन इतका तरी आकडा येणार का ? अंतिम जागावाटप निर्णय दिल्लीतूनच होणार