सोलापूर : सोलापुरातल्या या भयानक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. जन्म देण्यासाठी एक आई तिचा स्वतःचा जीव देखील पणाला लावत असते. असं म्हणतात की आईचा तो दुसरा जन्म असतो. पण सोलापुरातल्या या जन्मदात्रीनेच स्वतःच्याच पोटच्या मुलाचा असा भयानक अंत केला आहे. आपल्या सहा वर्षाच्या मृत मुलाला पाहून वडील देखील हादरले.
सोलापुरातील माढा तालुक्यातील कव्हे गावात हा भयानक प्रकार घडला आहे. जन्मदात्री आईने आपल्या पोटच्या मुलाचे कुऱ्हाडीने घाव घालून अक्षरशः दोन तुकडे केले आणि त्यानंतर तिने स्वतः देखील विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नक्कीच काहीतरी मोठं कारण असू शकतं की या जन्मदात्रीने स्वतःच्या मुलाची अशी निर्दयी पणे हत्या केली. आणि त्यानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिने मुलाची हत्या केल्यानंतर तिच्या सासऱ्यांना घडला प्रकार फोन करून कळवला होता. त्यानंतर तिच्या सासऱ्यांनी आरोपी आईचा भाऊ आणि पती यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. दोघांनीही घराकडे धाव घेतली. मयत मुलाचे वडील जेव्हा घरी पोहोचले तेव्हा समोरचा घडला प्रकार पाहून ते देखील हादरले.
दरम्यान या महिलेने स्वतःच्या पोटच्या मुलाचा असा निर्दयीपणे अंत का केला हे स्पष्टपणे समजू शकल नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.