कोल्हापूर : कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूरमध्ये एका तरुणीने तिच्या प्रियकरासोबत लिव्ह इन Live-in Relation मध्येच राहणार असा हट्ट धरला. या रागातून तिची आई, छोटा भाऊ आणि मामानं तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मृत तरुणी वैष्णवी पवार ही पुण्यामध्ये एका खाजगी बँकेमध्ये काम करत होती. पुण्यातीलच एका तरुणासोबत तिचे प्रेम संबंध होते. परंतु या दोघांनी लग्न न करता लिव्हइनमध्ये एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. खरंतर दोन्हीही कुटुंबीयांचा त्यांच्या प्रेम संबंधांना विरोध नव्हता. परंतु तरीही या दोघांना लिव्हइनमध्येच राहायचे होते. ही गोष्ट वैष्णवीच्या आईला मान्य नव्हती. वैष्णवीच्या आईने तिच्या भावाने आणि मामाने त्या दोघांनाही समजावण्याचा बराच प्रयत्न केला.
त्यासाठी त्या कोल्हापुरातून पुण्यात कात्रजमध्ये दोघांना समजावण्यासाठी गेल्या. पण ते दोघे त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यानंतर त्या वैष्णवीला घेऊन पुन्हा कोल्हापुरात आल्या. तिथे तिचा भाऊ सुरज (वय २०) , मामा संतोष अडसुळे (वय ३५) आणि आई शुभांगी (वय ५०) यांनी तिला काठी, दोर आणि लोखंडी सळई न बेदम मारहाण केली.
रात्रभर तिला मारहाण केल्यामुळे तिचा मृत्यू ओढावला आहे. बेदम मारहाणीमध्ये तिला शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाला. त्यामुळे तिचा जीव गेला आहे. नकळत झालेल्या कृतीने मुलीचा जीव गेला, म्हणून नातेवाईकांनी पश्चाताप व्यक्त केला. दरम्यान आई, भाऊ आणि मामाला पोलिसांनी अटक केली आहे.
NANA PATOLE : ” किती जागा पाहिजे सांगा ? अजूनही वेळ गेलेली नाही…! ” नाना पटोलेंची प्रकाश आंबेडकरांना थेट ऑफर, नेमकं काय म्हणाले ? वाचा सविस्तर