छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये या आठवड्यात एका व्यापारी आणि सामाजिक कार्य करणाऱ्या इसमाची हत्या करण्यात आली होती. प्राथमिक माहितीनुसार ही हत्या वाळूतस्कारांची माहिती दिल्यामुळे वाळू तस्करांनीच केली होती असं सांगण्यात आलं होतं. परंतु आता एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
पोलिसांनी केलेल्या अधिक तपासानंतर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस हेडकॉन्स्टेबल यांनीच या व्यापाऱ्याची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून या पोलिसांनीच व्यापा-याला डोक्यात गोळी घालून जागेवर ठार केले होते.
ज्या दिवशी ही हत्या झाली त्यादिवशी वाळू तस्करांनीच ही हत्या केली असल्याचे म्हटलं जात होतं. परंतु गुन्हे शाखेने केलेल्या अधिक तपासांती हा धक्कादायक खुलासा झाला आहे.