पणजी : गोव्यामधील पणजी शहरातून अत्यंत घृणास्पद बातमी समोर येते आहे. एका पाच वर्षाच्या चिमुरडीवर 15 ते 20 नराधमांनी बलात्कार केला आणि त्यानंतर तिची गळा दाबून हत्या केली आहे. याप्रकरणी गोवा पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण गोव्यातील वास्को परिसरात अवघ्या पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. शनिवारी हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गोवा पोलिसांनी 15 ते 20 संशयीतांना ताब्यात घेतल आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणावरून या संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले अशी माहिती एसपी सुनीता सावंत यांनी दिली. याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 376 आणि 302 तसेच पोक्सो कायदा आणि गोवा चिल्ड्रनुसार लैंगिक अत्याचार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने संपूर्ण गोवा हादरल आहे. चिमुकलीवर झालेल्या या अत्याचारामुळे आणि तिच्या हत्येमुळे तिच्या आरोपींना कठोरातील कठोर शासन देण्यात यावे अशी भावना संतप्त नागरिकांची आहे.