नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्या दोन मैत्रिणी आणि एक मित्र यांच्यामध्ये सगळं काही छान सुरू होतं. पानाच्या टपरी वरून त्यांनी सिगारेट घेतली आणि मैत्रिणींने त्या सिगारेटचा झुरका थेट मित्राच्या तोंडावर सोडला. ही गोष्ट मित्राला आवडली नाही म्हणून वाद सुरू झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की तिने तिच्या इतर मित्रांना बोलावून घेऊन थेट आपल्या चांगल्या मित्राची हत्या Murder करवली आहे.
ही घटना आहे नागपूरमधील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील, यामध्ये रणजीत राठोड या तरुणाचा जीव गेला आहे. या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील प्रमुख आरोपी जयश्री पानझरे वय 30, सविता सायरे वय 24 आणि आकाश राऊत वय 26 या तिघा जणांनी रणजीतवर हल्ला केला. या मारहाणीमध्ये रणजीत गंभीर जखमी झाला होता. नागरिकांनी रणजीतला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान रणजीत चा मृत्यू झाला. आरोपींच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे आणि प्रमुख आरोपी जयश्री ही शिवीगाळ करत असताना रणजीत याने मोबाईलमध्ये तिचा व्हिडिओ शूट केला होता. या व्हिडिओच्या आधारे आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
आजकाल सिगारेट, दारू पिणे, हुक्का हे सगळं काही फॅशनचा एक भाग झाल्यासारखा आहे. अगदी मुली सुद्धा सर्रास पणे या सर्व गोष्टी करतात. त्यात काय गैर आहे असं मानणारा देखील एक वर्ग आहे. पण खरंतर हे विकोपाला जाईल आणि त्यातून काही अनर्थ घडेल या मर्यादेच्या बाहेर जाणे हे नक्कीच निंदणीय आहे.