पुणे : पुणे तिथे काय उणे म्हणतात ते आता गुन्हेगारी जगताला देखील लागू होते आहे. कारण पुण्यामध्ये अक्षरशः शहरा येईल असे गुन्हे घडत आहेत. शनिवारी रात्री उशिरा वेदांत अग्रवाल या अल्पवयीन तरुणांन आपली पोर्शे कार बेदरकारपणे चालवून दोघा तरुणांना चिरडला आहे. हा अपघात एवढा भयानक होता की या अपघातात तरुण आणि तरुणी दोघेही जागीच ठार झाले. प्रत्यक्षदर्शिनी सांगितल्यानुसार हा तरुण आपली कार एवढी वेगाने चालवत होता की दुचाकीला बसलेल्या धडकेनंतर दुचाकी वरील तरुणी अक्षरशः दहा ते पंधरा फूट उंच उडाली. तर दुचाकी चालवणाऱ्या तरुणाला देखील डोक्याला जबर मार लागल्याने दोघांनीही जागीच शेवटचा श्वास घेतला.
या घटनेनंतर पुण्यात प्रचंड संतापाची लाट उठली आहे. दरम्यान पुण्यातील बांधकाम व्यवसायिक असलेले विशाल अग्रवाल यांचा वेदांत अग्रवाल हा मुलगा आहे. त्यांनीच आपली आलिशान गाडी भरधाव वेगात चालवून अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघा जणांना चिरडले. धक्कादायक म्हणजे या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आल्यानंतर जी कलमं लावण्यात आली होती ती बेलेबल असल्यामुळे त्याला जामीन देखील मिळाला आहे. त्याचबरोबर अपघात झाल्यानंतर आमदार सुनील टिंगरे यांनी वेदांत अग्रवाल याची बाजू मांडण्यासाठी थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतल्याचे देखील दिसून आले. त्यामुळे आता हे प्रकरण केवळ अपघाताच नाही तर राजकीय देखील झाल आहे. धनदांडग्या बापान चिरंजीवांना पाठीशी घालण्यासाठी आपली सगळी ताकद लावली असल्याची चर्चा पुण्याच्या सामान्यांपासून ते राजकीय वर्तुळात होते आहे.
या घटनेच एक सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आल आहे. या सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्पष्ट दिसून येते आहे की आरोपी वेदांत हा किती वेगाने आपली कार चालवत होता. हा अपघात झाला आहे यास जेवढा वेदांत हा जबाबदार आहे तेवढीच जबाबदारी विशाल अग्रवाल यांची देखील आहे. कारण वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन असल्यामुळे आता पालक आणि कार मालक यांच्यावर देखील कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो.
वेदांत अग्रवाल हा दारूच्या नशेत होता. पण या एका आठवड्यामध्ये पुण्यामध्ये अशाच विकृत घटना घडल्या आहेत. पिंपरी मधून एका नेपाळी दांपत्याने कृरतेचा कळस गाठलाय. आपल्या तीन मुलांच्या आई असलेल्या पत्नीवर निर्दयीपणे तिच्या गुप्तांगावर चिरफाड करून कुलूप लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला. तर येरवडा परिसरामध्ये तीस वर्षीय मुलगा आणि दहा वर्षीय नातवाने दारूसाठी पैसे देत नाही म्हणून आईवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात आईची देखील हत्या झाली आहे.