पुणे : पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून गोळीबारांचं सत्र सुरू आहे. यामध्ये विशेष करून पूर्ववैमानस्यातून गोळीबार केल्याच्या घटना आहेत. दरम्यान पुण्यामध्ये आज पहाटे साडेतीनच्या सुमारास दोघा जणांवर गोळीबार केल्याची घटना समोर येते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व वैमानस्यातून आकाश चंदाले यांनी विकी चंदाले याच्यावर गोळीबार केला आहे. पुण्यातील येरवडा परिसरातील अग्रेसन शाळेसमोर ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान पुण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने गोळीबाराच्या घटना घडतच आहेत. गेल्या आठवड्यामध्ये चार दिवस सलग गोळीबाराच्या घटना पुण्याच्या वर्दळीच्या ठिकाणी म्हणजेच सिंहगड रोड, जंगली महाराज रोड, हडपसर आणि आज पहाटे येरवडा परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे.