पुणे : पुण्यातल्या उच्चब्रू समजल्या जाणाऱ्या हिंजेवाडी भागातून एक खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे. पुण्याच्या आयटी सेक्टरमध्ये काम करणारी वंदना द्विवेदी या तरुणीचा मृतदेह हिंजेवाडीतील एका हॉटेलमध्ये आढळून आला आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली.
या हॉटेलमधून या तरुणीचा प्रियकर ऋषभ निगम हा अत्यंत शांतपणे बाहेर एकटाच पडताना दिसला. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा या तरुणीचा मृतदेह हॉटेलच्या त्या रूममध्ये आढळून आला. धक्कादायक म्हणजे या तरुणीवर पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या . पण या पाच गोळ्या झाडल्याचा आवाज हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना कसा आला नाही हा देखील मोठा प्रश्न आहे.
दरम्यान पोलिसांनी मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचा प्रियकर ऋषभ निगम याचा तपास सुरू केला असता तो मुंबईच्या दिशेने पळाल्याचे समजले. त्यानुसार पुणे पोलिसांनी मुंबई पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी या आरोपीच्या मुस्क्या आवळल्या आहेत.
आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही लखनऊमधील असून दोघेही उच्चशिक्षित होते. तसेच आयटी कंपनीमध्ये काम करत होते. लखनऊमध्ये दोघांची घरं जवळपासच आहेत. गेली दहा वर्षापासून दोघांचे प्रेम संबंध होते. परंतु संशयामुळे त्या दिवशी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि आरोपी वृषभ निगम यांनी थेट वंदना द्विवेदी यांच्यावर पाच गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मोठी बातमी : येत्या 7 दिवसात देशात CAA लागू होणार ! केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांचा खळबळजनक दावा; नेमका काय आहे CAA कायदा, वाचा सविस्तर