बारामती : बारामतीत आज एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अवघ्या 570 रुपयांचे लाईटचे बिल हे अधिक वाटल्याने विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने महिला महावितरण कर्मचाऱ्यांची निर्दयीपणे कोयत्याने वार करून हत्या केली.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मूळच्या लातूरच्या असलेल्या रिंकू बनसोडे या दहा वर्षापासून महावितरणच्या सेवेत आहेत. दरम्यान रिंकू बनसोडे यांना एक वर्षाचा मुलगा देखील आहे. त्यांनी काही वैयक्तिक कारणास्तव दहा दिवसांची सुट्टी घेतली होती. त्यानंतर बुधवारी 24 एप्रिलला त्या सकाळी कामावर पुन्हा रुजू झाल्या. यावेळी मोरगाव येथील त्यांच्या कार्यालयामध्ये त्या एकट्याच बसल्या होत्या.
दरम्यान अभिजीत पोटे हा आरोपी कार्यालयात आला. विजेचे बिल एवढे जास्त का आले ? असे म्हणून तो रिंकू यांना जाब विचारायला लागला. यावेळी संभाषण सुरू असताना संतापलेल्या आरोपीने रिंकू यांच्यावर एकापाठोपाठ 16 वार केले. यानंतर त्या जमिनीवर कोसळल्या. मोरगावमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले होते. त्यानंतर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांना तातडीने दाखल करण्यात आलं. परंतु दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
परभणीमध्ये महादेव जानकर यांची मोठी घोषणा ! ” निवडून आलो नाही तर संन्यास घेईन, 26 एप्रिल नंतर मी राज्यभरात उद्धव ठाकरेंच्या विरोधात रान पेटवणार !
या घटनेने रिंकू बनसोडे यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. रिंकू बनसोडे यांना एक वर्षाचा मुलगा होता. त्यामुळे परिसरातून प्रचंड हळहळ व्यक्त केली जाते आहे.