अमरावती : अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमरावतीतील तिवसा तालुक्यातील मार्डी येथील एका आश्रमात तापलेल्या तव्यावर बसून आशीर्वाद देणाऱ्या गुरुदास बाबाला अटक करण्यात आली आहे. एका महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात असलेल्या मार्डी येथील आश्रमामध्ये हा भोंदू बाबा तापलेल्या तव्यावर बसून भक्तांना आशीर्वाद द्यायचा. या बाबाची प्रसिद्धी काही दिवसातच सर्वदूर पसरली होती. दरम्यान एक महिला आपल्या व्यसनी पतीच्या त्रासाला कंटाळून या बाबाकडे मदतीसाठी आली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी या भोंदू बाबाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून त्यास अटक केली आहे.