उत्तर प्रदेश (जौनपुर) : भारतीय जनता पक्षाचे जिल्हा मंत्री प्रमोद यादव यांची आज गुरुवारी दि. ७ मार्च रोजी सकाळी मोटारसायकलवरून आलेल्या गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली. गोळी थेट छातीला लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडल
सकाळी दहाच्या सुमारास प्रमोद यादव आपल्या चारचाकी वाहनाने घराबाहेर पडले. रायबरेली-जौनपूर रस्त्यावरील गावाच्या वळणाजवळ पोहोचताच मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी येऊन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळी त्याच्या छातीत लागली. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस अधीक्षक डॉ. अजय पाल शर्मा यांनी जिल्हा रुग्णालय व घटनास्थळी जाऊन पाहणी केली. काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे.
Supreme Court : आज ठाकरे गटासाठी महत्त्वाचा दिवस ! नार्वेकरांच्या निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, महाराष्ट्राचे लक्ष दिल्लीकडे
कोण आहेत प्रमोद यादव
भाजपचे जिल्हामंत्री असलेले प्रमोद यादव हे माजी खासदार धनंजय सिंह यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यांचे वडील राजबली यादव हेही जनसंघाशी संबंधित होते. परस्पर वैमनस्यातून गावातच त्याचीही हत्या करण्यात आली होती. ट्रान्सपोर्टर म्हणून काम करणारे प्रमोद यादव यांनी २००७ ची विधानसभा निवडणूक रारी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मल्हनी विधानसभा मतदार संघासाठी उमेदवार जाहीर केला होता, मात्र उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यावेळी धनंजय सिंह यांच्या पत्नी जागृती यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती, पण त्याही पराभूत झाल्या होत्या.