पुणे : पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह केसमध्ये Pune Car Accident आज एक मोठी अपडेट समोर येते आहे. मुलाचे ब्लड रिपोर्ट बदलण्यात आले होते. हे ब्लड रिपोर्ट एका महिलेचे असल्याचे समोर आल्यानंतर ते वेदांत अग्रवालच्या आईचे होते अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आज सकाळी क्राईम ब्रँचने शिवानी अग्रवाल Shivani Agarwal हिला ताब्यात घेतले आहे.
शिवानी अग्रवाल ही काही दिवसांपासून गायब झाली होती. आवश्यकतेनुसार शिवानी अग्रवाल हिला देखील चौकशीसाठी बोलवले जाईल असं यापूर्वी देखील पोलिसांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आज शिवानी अग्रवाल हिचा शोध घेऊन तिला अटक करण्यात आली आहे.
ज्या दिवशी अपघात झाला त्यादिवशी वेदांत याचे ब्लड रिपोर्ट बदलण्यात आले होते. यामध्ये आता ससून मधील डॉक्टर्स, कामात कसूर करणारे पोलीस अधिकारी यांचे देखील निलंबन झालं असून बदलले गेलेले ब्लड रिपोर्ट हे एका महिलेचे होते त्यामुळे आज शिवानी अग्रवाल हिचे देखील ब्लड टेस्ट केले जाणार आहे. त्यानंतर काही गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. दरम्यान आज शिवानी अग्रवाल हीची चौकशी वेदांत अग्रवाल याच्या समोर बसवून केली जाणार आहे. त्यामुळे आजच्या या चौकशीतून अनेक खुलासे देखील होऊ शकतात.