मुंबई : मराठी अभिनेते पुष्कर श्रोत्री यांच्या घरातून घरकाम करणाऱ्या महिलेने १० लाख २७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि १ लाख २० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. पुष्कर शोत्री यांनी उषा गांगुर्डे आणि भानुदास गांगुर्डे या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
एफआयआरनुसार, विलेपार्ले पूर्वयेथे राहणारे व्यापारी पुष्कर श्रोत्री यांच्याकडे कामासाठी आणि वडिलांची काळजी घेण्यासाठी तीन घरमदतनीस होते. त्यापैकी उषा गांगुर्डे (४१) यांनी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ५ ते ६ महिने काम केले. शोत्री यांच्या घरातून १ लाख २० हजार रुपये आणि ६० हजार रुपयांचे परकीय चलन चोरून नेले. २२ ऑक्टोबर रोजी पुष्कर यांची पत्नी प्रांजल यांना उषा गांगुर्डे यांच्यावर संशय आला. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि तपासादरम्यान तिने पैसे चोरल्याची कबुली देत स्वाधीन केले
दुसरी घटना २४ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली जेव्हा प्रांजल शोत्री यांनी कपाटातील सोन्याचे दागिने काढले आणि त्यांच्यात काहीतरी विचित्र दिसले. शोत्री कुटुंबीय सोन्याचे दागिने खरेदी केलेल्या दागिन्यांच्या दुकानात घेऊन गेले असता दागिने बनावट असल्याचे लक्षात आले. त्यानंतर उषा गांगुर्डे यांनी खरे दागिने चोरून त्याजागी तेच बनावट दागिने आणल्याचे तपासादरम्यान उघड कीस आले.
त्यामुळे पुष्कर श्रोत्री यांनी २६ ऑक्टोबर रोजी विलेपार्ले पोलिस ठाण्यात उषा आणि तिच्या पतीविरोधात भारतीय दंड विधान कलम ३४, ३८१, ४०६ आणि ४२० अन्वये गुन्हा दाखल केला.