मुंबई : मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर Abhishek Ghosalkar यांची गुरुवारी रात्री पाच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हा संपूर्ण घटनाक्रम अत्यंत धक्कादायक आहे. जेव्हा हत्या करण्यात आली तेव्हा फेसबुक लाईव्ह चालू होते. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार देखील या फेसबुक लाईव्ह मध्ये रेकॉर्ड झाला आहे.
या घटनेनंतर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो की कायदा आणि सुव्यवस्थेची भीती राहिली नाही का ? या हत्ये मागील प्रमुख आरोपी मॉरिस नरोन्हा याने देखील स्वतःवर दोन गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. घटना घडली तेव्हा लालचंद पाल आणि काही कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नेमकं काय घडलं ते पाहुयात.
Abhishek Ghosalkar Murder Case : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी दोघा जणांना अटक
गुरुवारी रात्री नेमकं काय घडलं
- माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांना हळदी कुंकू कार्यक्रम करू असे सांगून मॉरिस नरोना यांनी बोलावून घेतले होते. संध्याकाळी या कार्यक्रमासाठी मॉरिस याच्या कार्यालयात घोसाळकर पोहोचले.
- घोसाळकर यांनी लालचंद पाल यांना फोन करून काही कार्यकर्ते या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी घेऊन येण्यास सांगितले.
- कार्यालयात पोहोचल्यानंतर आरोपी मॉरिस्मोरोना यांनी घोसाळकर यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह करायचे आहे असे सांगून इतरांना बाहेर बसण्यास सांगितले.
- काही वेळाने फेसबुक लाईव्ह च्या केबिन मध्ये होत होते. तिथून गोळीबाराचा आवाज आला अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस हा मिस्टर मधून बाहेर करत होता. घोसाळकर खाली पडले कार्यकर्त्यांनी त्यांना रुग्णालयात हलवण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या.
- या वेळात मॉरिस पायऱ्यांवरून पहिल्या मजल्यावर गेला आणि त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन दोन गोळ्या पिस्टल मध्ये परत भरल्या आणि त्या स्वतःवर झाडून आत्महत्या केली.
- ही माहिती प्रत्यक्षदर्शी लालचंद पाल यांनी दिली आहे. सध्या याप्रकरणी दोन आरोपी मॉरिस्नोर होणार याचा पीए मेहुल पारिक आणि रोहित साहू या दोघांना ताब्यात घेण्यात आला आहे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.