मुंबई : मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर Abhishek Ghosalkar यांच्यावर काल पाच गोळ्या झाडून त्यांची बेदरकारपणे हत्या Murder Case करण्यात आली आहे याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तपासाची सूत्र वेगाने फिरवली होती. दरम्यान दोघा जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते आहे. या प्रकरणी मेहुल पारित आणि रोहित साहू या दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर काल फेसबुक लाईव्ह दरम्यान पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. याप्रकरणी मेहुल पारिख आणि रोहित साहू या दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले. जेव्हा गोळीबार करण्यात आला तेव्हा मेहुल पारेख हा घटनास्थळी उपस्थित होता.
https://www.facebook.com/share/p/D8Rnh8kJCuBy5Mxj/?mibextid=qi2Omg
मॉरिस नोरोन्हा यानेच अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. पाच गोळ्या या हल्ल्यामध्ये झाडण्यात आल्या होत्या. यापैकी तीन गोळ्या घोसाळकर यांना लागल्या होत्या. यामध्येच घोसाळकर यांचा काल मृत्यू झाला आहे. यामध्ये मॉरिस नोरोन्हा याचा पीए मेहुल पारीख याला रात्री ताब्यात घेण्यात आलं. तसेच आता रोहित साहू या व्यक्तीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते आहे.