नाशिक : त्र्यंबकेश्वरमध्ये साधू आणि वारकऱ्यांमध्ये जागेच्या वादातून कडाक्याचं भांडण झालं. या भांडणातून साधूंनी वारकऱ्यांना शिवीगाळ करून हाकलून दिल्याचा प्रकार घडल्याचं बोलले जाते आहे. तसेच चाकू घेऊन साधूनी वारकऱ्यांचे तंबू देखील उखडून टाकले आहेत.
नेमकं काय घडलं
नाशिक मधील त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेला सहा जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या यात्रेसाठी तब्बल पाच लाख भाविक त्रंबकेश्वर मध्ये दाखल होत आहेत. दरम्यान संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांचे निवासस्थानं ठरलेली असतात. त्यानुसार वारकऱ्यांनी त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे तंबू देखील उभारले होते. मात्र काही साधूंनीं जागेच्या वादावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि या बाचाबाचीमध्ये साधूंनी चक्क हातात चाकू घेऊन वारकऱ्यांचे हे तंबू देखील उघडले असल्यास म्हटलं जात आहे.
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर आता पोलीस प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.