पुणे : विद्यार्थ्यांसाठी चंगली बातमी आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना आता एक वर्षातच पदव्युत्तर पदवी करता येणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून पारंपारिक दोन वर्षांच्या पदव्युत्तर शिक्षणाबरोबरच एक वर्षाचा पर्यायही उपलब्ध असेल. पदवीचेच विषय निवडण्याचे निर्बंधही काढणार असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
पुढील वर्षाच्या केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षेत (CUET-PG) विद्यार्थी आवडीच्या विषयात पात्रता मिळवून मास्टर्सचा अभ्यास करू शकतील. ‘UGC’च्या नियामक मंडळाच्या बैठकीत पदव्युत्तर कार्यक्रमासाठी नवीन अभ्यासक्रम आणि श्रेयांक आराखडा मंजूर करण्यात आला. हा मसुदा या आठवड्यात राज्ये आणि विद्यापीठांना पाठवला जाईल. नवीन नियमांनुसार आता विद्यार्थ्यांना अभ्यासाचे माध्यम बदलण्याचा पर्यायही मिळणार आहे. यात ऑफलाइन, दूरस्थ, ऑनलाइन लर्निंग आणि हायब्रीड अशा माध्यमांतून सोयीनुसार अभ्यास करता येईल.
नवीन अभ्यासक्रमात बहुविद्याशाखीय अभ्यासाची सुविधा
मास्टर्ससाठी कोणताही विषय निवडण्याची मुभा
पदव्युत्तर शिक्षणात विद्याशाखा बदलण्याचा पर्याय
मात्र त्यासाठी संबंधित विषयाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक
तीन वर्षांच्या पदवीसाठी दोन वर्षांचीच पदव्युत्तर पदवी
नव्या धोरणातील चार वर्षांच्या पदवीसाठी एक वर्षाची पदव्युत्तर पदवी
राज्यांनी आराखडा स्वीकारून विद्यापीठांनी अभ्यासक्रम तयार करणे गरजेचे
विद्यापीठांनी आराखडा स्वीकारल्यानंतरच राज्यात अंमलबजावणी होणार