गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात तलाठीपदाच्या परीक्षा पार पडल्या. आता या परीक्षेसंदर्भात एक अपडेट्स आली आहे. आता तलाठी पदाच्या परीक्षेसाठी नमुना उत्तरपत्रिका तयार करण्यात आली असून त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या सर्व हरकती 31 ऑक्टोबरपर्यंत करून त्यानंतर अंतिम उत्तरपत्रिका प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मात्र हरकत नोंदविण्यासाठी 100 रुपय शुल्क भरावे लागणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी 15 डिसेंबरपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. ही यादी जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे उमदेवारांना नियुक्तीपत्र जानेवारी महिन्यात भेटण्याची शक्यता आहे.