पुणे : विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर कौशल्यविकास अभ्यासक्रमांचे विशेष महत्त्व असल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आता कौशल्याभिमुख अभ्यासक्रमांची संख्याही वाढवली आहे. विद्यापीठाने यंदाच्या वर्षी विविध विभागांतर्फे यंदा नऊ अभ्यासक्रम नव्याने सुरू केले आहे. याबातची माहिती विद्यार्थ्यांना असणं महत्वाचं आहे.
2023-24 या वर्षात सुरु केलेले नवे अभ्यासक्रम :
सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (स्पर्धा परीक्षा विभाग)
प्रोफेशनल डिप्लोमा इन केमिकल सायकॉलॉजी
बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स- ॲप्लाइड आर्ट्स (तंत्रज्ञान)
बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स – प्रिंटिंग टेक्नॉलॉजी
सर्टिफिकेट कोर्स इन इट्रॉडक्शन टू ड्रोन टेक्नॉलॉजी
एमटेक इन सायंटिफिक इन्स्ट्रूमेंटेशन, मेडिकल डिव्हाइस ॲंड डायग्नॉस्टीक्स
पीजी डिप्लोमा इन ब्लॉक चेन प्रोजेक्ट मॅनेजमेंट
पीजी डिप्लोमा इन ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी
एमए इन जापनीज