पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत Maharashtra State Examination Council पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा Scholarship Exams १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी आयोजित करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन अर्ज Online application भरण्याकरीता ७ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज ७ डिसेंबरपर्यंत भरता येणार आहेत.
१८ फेब्रुवारी, २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पार पडेल. नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज ७ डिसेंबरपर्यंत भरता येणार आहेत. विलंब शुल्कासह ८ ते १५ डिसेंबर, अतिविलंब शुल्कासह १६ ते २३ डिसेंबर, अतिविशेष विलंब शुल्कासह २४ ते ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
हे वाचलेत का ? COP 28 Summit : शिखर परिषदेसाठी PM Narendra Modi दुबईत दाखल, पहा फोटो
दरम्यान, ३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत आवेदनपत्रे स्वीकारले जाणार नाही. याची नोंद घेऊन शाळांनी ऑनलाईन अर्ज ७ डिसेंबरअखेर पर्यंत भरण्याची कार्यवाही करावी असे आवाहन परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी केले आहे.