गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस RAIN UPDATE थैमान घालत आहे. त्यामुळे शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशातच आता IMD ने एक अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार येत्या 24 तासांत राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी :
▪️हवामान विभागाने पुण्यासह नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.
यासोबतच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती, गोंदिया आणि नागपुरात विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. तर दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाची सरी कोसळण्याची शक्यता आहे.