सोलापूर : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. कांदा निर्यात बंदी नंतर कांद्याच्या दरामध्ये प्रचंड घसरण होते आहे. निर्यात बंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर कांद्याचे दर आता हजार रुपयांच्या देखील खाली आले आहेत. कांदा निर्यात बंदीचा निर्णय होण्यापूर्वी हेच कांद्याचे दर चार हजार रुपयांवर होते. दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता साधा उत्पादनाचा खर्च देखील वसूल करता येत नाही.
नाशिक जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हजार रुपयांपर्यंत कांद्याला दर मिळतो आहे. गेल्या सात महिन्यांमधील हा निच्चांक्की दर आहे. त्यामुळे सध्या कांदा शेतकऱ्यांना चांगलाच रडवतो आहे. कांद्याचे भाव घसरत असल्याकारणाने केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी देखील कांदा व्यापारी करत आहेत.