नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात महिला आणि युवकांवर भर देण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांनी गरिबांना घरे आणि सर्वसामान्यांना मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीलाच मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती दिली आणि सांगितले की, आमचे सरकार गरिबांच्या सक्षमीकरणावर विश्वास ठेवते. सरकारी योजनांमुळे गरिबी कमी झाली आहे. आमच्यासाठी महिला, गरीब, तरुण आणि शेतकरी अशा चार जाती असून त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
Budget 2024 Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात, वाचा ठळक मुद्दे
यावेळी कृषी क्षेत्राला देखील या अर्थसंकल्पामध्ये विशेष लक्ष देण्यात आल्याचं दिसून आल आहे. या अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्राला नेमकं काय मिळणार याकडे बळीराजाचं लक्ष तर होतच, दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिलेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा देखील करण्यात आली असून ४ कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ दिला असल्याच देखील अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितला आहे.
https://www.facebook.com/share/v/RettRjqt3ubcofPU/?mibextid=qi2Omg
कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात असलेल्या तरतुदींचे ठळक मुद्दे
- पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेला प्रोत्साहन देणार
- नॅनो युरियाच्या यशानंतर नॅनो डीएपी चा प्रयोग करणार
- दुग्ध उत्पादकांच्या मदतीसाठी योजना आखली जाणार
- शेतीसाठी आधुनिक साठवणूक यंत्रणेवर भर देणार
- पाच इंटिग्रेटेड एक्वा पार्क उघडणार
अर्थसंकल्पतील महत्वाचे मुद्दे
- अर्थसंकल्पात महिला आणि युवकांवर भर देण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांनी गरिबांना घरे आणि सर्वसामान्यांना मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले.
- अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीलाच मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती दिली. आमचे सरकार गरिबांच्या सक्षमीकरणावर विश्वास ठेवते. सरकारी योजनांमुळे गरिबी कमी झाली आहे. आमच्यासाठी महिला, गरीब, तरुण आणि शेतकरी अशा चार जाती असून त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
- टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही : अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, यावेळी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. प्राप्तिकराची मर्यादा पूर्वीप्रमाणेच ७ लाख राहील, ज्याचा फायदा नोकरदार व्यक्तीला होणार नाही.
- मोफत विजेची घोषणा : अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली की, येत्या काळात रूफटॉप सोलरायझेशनचा फायदा 1 कोटी कुटुंबांना होईल. यामुळे महिन्याला ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. यामुळे १५ ते १८ हजार रुपयांची बचत होईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
- सरकार आणणार घरकुल योजना : अर्थमंत्र्यांनी प्रत्येक गरीबाला घर देण्याची घोषणा केली आहे. भाड्याची घरे, झोपडपट्ट्या किंवा अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी घर खरेदी करण्यासाठी सरकार नवीन गृहनिर्माण योजना आणणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
- प्रत्येक गरीबाला घर देण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. सरकारने यापूर्वीच गरिबांना 2 कोटी घरे दिली आहेत आणि 4 कोटी घरांचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या जवळ आहे. सीतारामन म्हणाल्या की, आमच्या सरकारने ७० टक्के महिलांना घरे देण्याचे काम केले आहे.
- सध्याच्या रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचा वापर करून सरकार आणखी वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याचा विचार करीत आहे. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे.
- गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी लसीकरण मोहीम : गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग दूर करण्यासाठी सरकार ९ ते १४ वयोगटातील मुलींच्या लसीकरणाला प्रोत्साहन देणार आहे.
- आयुष्मान भारतचा विस्तार : आयुष्मान भारत अंतर्गत सर्व आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी आरोग्य सेवा कवच ाचा विस्तार करण्यात आला आहे.
- सरकारने संरक्षण खर्च वाढवून 11.1 टक्के केला आहे, तो जीडीपीच्या 3.4 टक्के असेल.
- रेल्वे अपग्रेड होणार : वंदे भारत स्तराचे 40 हजार रेल्वे डबे बनवले जातील. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, अधिक गर्दीच्या रेल्वे मार्गांसाठी 3 स्वतंत्र कॉरिडॉर तयार केले जातील.
- आमच्या सरकारने 3 कोटी महिलांना कोट्यधीश बनवण्याची योजना आखली आहे आणि आतापर्यंत 1 कोटी कोट्यधीश झाले आहेत.