मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती मधील अंतर्गत बैठका खलबतींना वेग आला आहेदरम्यान काल महाविकास आघाडीची दुसरी बैठक पार पडली. ज्यामध्ये कोणत्या जागा कोणाच्या पारड्यात पडणार यावर महत्त्वाची चर्चा पार पडली आहे. असं समजतं आहे की, राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी 40 जागा कोण लढवणार हे निश्चित झाले आहे. अर्थात यावर अद्याप स्पष्टीकरण आलेले नाही तरी आठ जागांवर अद्याप विचारविनिमय सुरू आहे.
कोणत्या आहेत या 8 जागा
48 पैकी 40 जागा कोण लढवणार हे जवळपास निश्चित झाले असून नागपूर मधील रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, जालना आणि शिर्डी या आठ जागांवर नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही. सध्या परिस्थिती पाहिली तर महाविकास आघाडीमध्ये या आठ जागांपैकी पाच जागांवर (शिवसेना शिंदे गट) आहे.
MLA Anil Babar : खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन, 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सध्या रामटेकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे कृपाल तुमाने यांच्याकडे खासदार पद आहे. हिंगोलीमध्ये शिवसेना शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील आहेत. वर्धामध्ये भाजपचे खासदार रामदास तडस आहेत. तर भिवंडीमध्ये भाजपचे खासदार कपिल पाटील हे आहेत. जालना भाजप खासदार रावसाहेब दानवे यांच्याकडे आहे. शिर्डी शिवसेना शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे, मुंबई दक्षिणमध्य शिवसेना शिंदे गट खासदार राहुल शेवाळे, तर मुंबई उत्तर पश्चिम शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर हे आहेत.
दरम्यान महाविकास आघाडीची पुढची बैठक आता 2 फेब्रुवारीला होणार आहे. वंचित बहुजन आघाडी देखील आता महाविकास आघाडीमध्ये आहे. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा आणखी वाढू शकतो .
https://www.facebook.com/share/v/Jqk8pkLGknUDd8Ae/?mibextid=qi2Omg