मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी रणनीती आखली आहे. प्रत्येक घटक पक्ष आपली ताकद आजमावू पहात आहे. अशातच महाविकास आघाडीची आज बैठक पार पडते आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीला देखील आमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर हे उपस्थित होते. परंतु त्यांना बैठकीला बोलवून देखील बाहेरच तासाभरापेक्षा जास्त वेळ बसवून ठेवण्यात आलं त्यामुळे त्यांनी बैठक स्थळावरून काढता पाय घेतला आहे.
https://www.facebook.com/emahatalks/videos/347415148164114
आघाडीच्या या वागणुकीवरून याआधीही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. आज देखील त्यांनी काँग्रेसवर खरपूस टीका केली आहे. तर बैठकीला बोलवून देखील बाहेरच तासभर बसवल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर हे आमंत्रित करण्यात आल्यानुसार मुंबईच्या ट्रायटेंड हॉटेलमध्ये बैठकीसाठी पोहोचले होते. यावेळी पुंडकर यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तुम्ही बाहेर थांबा असं सांगून तासाभरापेक्षा जास्त वेळ बसवून ठेवले. यावेळी हॉटेलच्या बाहेर येऊन पुंडकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की बैठक सुरू झाली तेव्हा आपण सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. महाविकास आघाडीने मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिकृत भूमिका स्पष्ट करावी तसेच तुमच्या जागा वाटपाचा फॉर्मुला सांगा. यासह काही मुद्दे मांडले होते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बाहेर बसण्याचा आवाहन केलं. बराच वेळ बाहेर बसून देखील त्यांना पुन्हा बैठकीसाठी आत न बोलावल्याने पुंडकर यांनी बैठकीतून काढता पाय घेतला आहे.