सोलापूर : सोलापुरातल्या SOLAPUR CRIME या खळबजलक घटनेने बाप लेकाच्या नात्याला काळीमा फासली आहे. सोलापुरातील विजय बट्टू या नराधम पित्याने पोटच्या चौदा वर्षीय विशालला कोल्ड्रिंकमधून विष पाजून Murder संपवलं आहे. आरोपीच्या पत्नीचा संशय बळवल्यानंतर तिने स्वतःच आपल्या मुलाची हत्या केली म्हणून पोलीस स्टेशनमध्ये पतीच्या विरोधात फिर्याद दाखल केली.
नेमकं काय घडलं ?
खरंतर आई जन्म देते, पालन करते आणि मायेन वाढवते हे खरं असलं तरी संकट कितीही मोठं असलं अशावेळी पहिली आठवण ही बापाचीच येत असते. खंबीरपणे आपल्या मुलांच्या संकटाच्या समोर उभा राहणारा बापच मात्र विशालच्या समोर संकट म्हणून उभा राहिला. शाळेतून खोडकरपणाच्या येणाऱ्या तक्रारी तसेच मोबाईलवर चुकीचे व्हिडिओ पाहिले याचा राग मनात धरून आरोपी पिता विजय बट्टू यांनी स्वतःच्याच मुलाला थम्सअपमध्ये सोडियम नायट्रेटची पावडर घालून ठार केले आहे.
13 जानेवारी रोजी विशाल सापडत नाही म्हणून त्याची आई, आरोपी वडील आणि इतर नातेवाईकांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. दरम्यान त्याच दिवशी रात्री अकरा वाजता सोलापूरच्या तुळजापूर नाका परिसरामध्ये एक अल्पवयीन मुलगा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. परंतु दुर्दैवाने त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र वेगाने फिरवली. दरम्यान माझ्याकडून खूप मोठी चूक झाली असे आरोपीने त्याच्या पत्नीकडे बोलून दाखवले आणि घडल्या धक्कादायक प्रकाराची माहिती आरोपीच्या पत्नीनेच पोलिसांना कळवली आणि हा गुन्हा उघडकीस आले आहे.
या नराधम पित्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.