नई दिल्ली : प्रसिद्ध रिएलिटी शो ‘बिग बॉस सीझन 17’ Bigg Boss Season 17 गेल्या वर्षी 15 ऑक्टोबरला सुरू झाला होता. बिग बॉसच्या घरात ‘नया घर’ या अनोख्या थीम आणि वेगवेगळ्या प्रोफेशनच्या स्टार्सने चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती. तीन महिने उलटून गेले असून ग्रँड फिनालेला अवघे काही तास शिल्लक आहेत. रविवारी सलमान खान या सीझनच्या विजेत्याची घोषणा करणार आहे.
ग्रँड फिनाले कधी आणि कुठे प्रसारित होईल ?
”बिग बॉस 17′ चा ग्रँड फिनाले उद्या म्हणजेच 28 जानेवारी 2024 रोजी टेलिकास्ट होणार आहे. यावेळी ग्रँड फिनाले एक-दोन नव्हे तर सहा तास चालणार आहे. कलर्स वाहिनीवर संध्याकाळी ६ वाजता फिनाले नाईटला सुरुवात होईल. ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर ही तुम्ही बिग बॉसचं लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता.
16 स्पर्धकांना मागे टाकत टॉप 5 स्पर्धकांनी ‘बिग बॉस 17’च्या फिनालेच्या शर्यतीत स्थान मिळवले. यात अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण मशेट्टी यांचा समावेश आहे.

”बिग बॉस १७’च्या विजेत्याची घोषणा रविवारी होणार आहे. सोशल मीडियावर विजेत्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, मतदानाचा कल मुनव्वर फारुकी याच्या बाजून आहे. मुनव्वर यंदाच्या मोसमात विजयी होतील, असे मतदानाच्या कलावरून मानले जात आहे. मुनव्वर याच्यानंतर अभिषेक कुमारला सर्वाधिक मते मिळाली आहेत. तर अंकिता तिसऱ्या, मनारा चौथ्या आणि अरुण पाचव्या स्थानावर आहे.
https://www.instagram.com/reel/C2mcbkbtisw/?utm_source=ig_web_copy_link
बिग बॉस 17 च्या विजेत्याची बक्षीस रक्कम
दरवर्षी ‘बिग बॉस’च्या विजेत्याला कोट्यवधींचा चेक दिला जातो. यंदाच्या सीझनमध्येही विजेता मालामाल होणार आहे. एका रिपोर्टनुसार, या सीझनच्या विजेत्याला 30 ते 40 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. बक्षिसाच्या रकमेसह विजेत्याला सीझन १७ थीमची ट्रॉफी आणि एक कार भेट म्हणून दिली जाईल.