चंद्रपूर : चंद्रपुरातून एक धक्कादायक घटना उघडकीस येते आहे. चंद्रपूरचे शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांची हत्या करण्यात आली आहे. अवघ्या तिसाव्या वर्षी शिवा वझरकर या युवा नेत्याने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्याच मित्राच्या कार्यालयापाशी त्यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
या घटनेने चंद्रपुरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान संतप्त युवा सेना कार्यकर्त्यांनी संशयित आरोपीच्या वाहनांची तोडफोड केली आहे. तर ठाकरे गटाचे शिवसैनिक देखील मोठ्या संख्येने चंद्रपूर मध्ये दाखल झाले आहेत.
दरम्यान प्रजासत्ताक दिनानिमित्त कठोर पोलीस बंदोबस्त शहरात असताना देखील अशी भीषण घटना घडली आहे त्यामुळे पोलीस प्रशासन अधिक अलर्ट मोडवर आहे पोलीस आरोपीचा शोध घेत असून पूर्वीच्या भांडणातून ही हत्या करण्यात आली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.