मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारणात वादळी वारे वाहत आहे. मराठा समाजाला आरक्षण MARATHA RESERVATION मिळावं या मतावर अनेक नेते मंडळी सकारात्मक आहे. परंतु मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी सातत्याने आपली भूमिका स्पष्टपणे मांडताना ओबीसी समाजावर अन्याय होता कामा नये हे मत ठाम ठेवले आहे.
सध्या मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मुंबई पर्यंत येऊन धडकले आहे. आझाद मैदानावर जाऊन विजयाचा गुलाल उधळणार अशीच भूमिका मनोज जरांगे पाटील यांची आहे. राज्य शासन सातत्याने मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु अद्याप देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या आवाहनाला थारा दिला नाही.
Maratha Reservation : ” सरकारने एवढं केलं असलं तर मग आम्ही आझाद मैदानाकडे जाणार नाही…!” नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील, वाचा सविस्तर
मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली थेट भूमिका
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी आणि मागण्यांबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा थेट भूमिका मांडताना म्हटले आहे की, ” कायद्याच्या कसोटीत जे काही बसते ते देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आजकाल कुणीही कोर्टात जातो त्याची चिरफाड होते. त्यामुळे कायद्यात काय बसेल त्यानुसार होईल. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या असं माझं देखील म्हणलं आहे. पण ओबीसीवर अन्याय होता कामा नये, या मतावर आम्ही ठाम आहोत. ओबीसींवर अन्याय झाला तर निश्चितपणे ओबीसी समाजाचे देखील आंदोलन सुरू होईल. दोन्हीही बाजूचा विचार करून योग्य तो निर्णय सरकार घेईल. आम्ही आमची मत जाहीर सभेतून मांडतो आणि आम्ही त्याला विरोध देखील करतो. आणि आम्ही ती मांडू अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.