लोणावळा : लोणावळ्यातून काही वेळापूर्वीच जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे दरम्यान चर्चा करण्यासाठी लोणावळ्यातच पोलिसांनी मोर्चा अडवला आहे.
आम्हाला मुंबईत येण्याची हौस नाही, आरक्षण द्या गावी परत जातो अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे तर दुसरीकडे जरांगे पाटील यांनी आपल्या सोबतचा लाखोंचा फौजभाटा घेऊन मुंबईकडे यावी नये यासाठी राज्य सरकार तोडगा काढण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना अडवले असून सध्या त्यांच्याशी चर्चा सुरू आहे नेमकी काय चर्चा होते आहे हे काही वेळातच स्पष्ट होईल.
मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी नाकारली
मुंबईत हे आंदोलन आझाद मैदानावर करण्याचे नियोजन आहे. परंतु हे मैदान आंदोलनासाठी वापरण्यास मुंबई पोलिसांनी स्पष्ट नकार दिला आहे. मराठा आंदोलनामुळे विपरीत परिणाम होऊन मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडेल असं या नोटीसमध्ये म्हटले आहे. तसेच आंदोलकांची संख्या पाहता मुंबईत आंदोलकांना जागा पुरेल एवढे मोठे मैदान नाही, म्हणून हे आंदोलन खारघर मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान या ठिकाणी करण्यात यावे असं मुंबई पोलिसांनी दिलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे.