पुणे : मराठा समाजाला सरसकट आरक्षण Maratha Reservation दिलं जावं या मागणीसाठी गेली कित्येक महिन्यांपासून मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत होते. परंतु आपल्या मागण्यांना सरकार मान्य करत नाही आणि दिलेली आश्वासन पूर्ण होत नाहीत याचा अंदाज घेऊन 20 जानेवारी पर्यंत सरकारनं योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा मुंबईमध्ये पाई यात्रा करून येणार आणि आंदोलन करणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. त्यानुसार आज या पदयात्रेचा पाचवा दिवस आहे.
20 जानेवारीला अंतरवाली सराटी मधून निघालेली ही पदयात्रा आता पुण्यापर्यंत येऊन धडकली आहे. पुढच्या काही तासातच हे भगव वादळ मुंबईमध्ये पोहोचेल. त्यानंतर राज्य सरकार नेमका काय निर्णय घेतो हे आता लवकरच समजेल.
दरम्यान पुण्यात जरांगे पाटील यांच्या पदयात्रेत जोरदार स्वागत करण्यात आल आहे. जालन्यातील अंतरवाली सराटीकडून अहमदनगर मार्गे हे वादळ पुण्यापर्यंत आल आहे. टप्प्यात येणाऱ्या प्रत्येक ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी सर्व आंदोलनकर्त्यांची चांगली सोय केली.
दरम्यान जरांगे पाटील हे पुण्यात पोहोचल्यानंतर पुणे पोलिसांनी जरांगे पाटील आणि आंदोलनकर्त्यांना येरवडा आणि खडकी मार्गे बोपोडीकडे पुढे सरकावे असे सांगितले होते. परंतु पाटील यांनी ही मागणी धुडकावून लावली असून याचा परिणाम पुण्यातील रोजच्या दळणवळणावर होण्याची दाट शक्यता आहे.