भारत : म्यानमारच्या 600 सैनिकांनी आणि नागरिकांनी मिझोराममध्ये घुसखोरी केल्यानंतर आता म्यानमारची सीमा सुरक्षित करण्याच्या उद्देशाने सीमेवर फेंसिंग करण्यात येणार आहे. तसेच परवानगी घेतल्याशिवाय म्यानमार भारत सीमारेषा India-Myanmar ओलांडता येणार नाही.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, भारत आणि म्यानमार यांच्यातील सीमावाद सध्या टोकाकडे जाऊ लागला आहे. म्यानमारच्या 600 सैनिकांनी आणि लोकांनी मिझोराममध्ये घुसखोरी केली आहे. त्यामुळे सीमारेषेवर तणाव वाढला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आता ज्याप्रमाणे बांगलादेश सीमेवर तारेच कुंपण घालण्यात आलं आहे त्याचप्रमाणे म्यानमार सीमेवर देखील तारेचे कुंपण घालण्यात येणार आहे. अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे.