नवी मुंबई : खारघर मधील हत्याकांड आणि आत्महत्येच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील खारघरमध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय वैभव बुरुंगले यांनी आपल्या 19 वर्षीय प्रेयसी वैष्णवी बाबर हिचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर स्वतः रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने खारघर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नवी मुंबईतील खारघरमध्ये वैष्णवी बाबर आणि वैभव बुरुंगले हे दोघेजण पाच वर्षातून प्रेम संबंधात होते. दरम्यान काही दिवसांपासून वैष्णवी ही तिच्या घरच्यांचा या प्रेमसंबंधांना विरोध असल्याकारणाने दुरावत चालली होती. या भीतीने वैभवने तिची हत्या करण्याचा कटरचला होता.
अशी केली वैष्णवी बाबरची हत्या
वैष्णवी हिला वैभवने 12 डिसेंबरला खारघरच्या टेकडी परिसरात भेटायला बोलावलं होतं. या दिवशी ते भेटले ते शेवटचं होतं. कारण वैभवने वैष्णवीची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर संध्याकाळी जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केली.
या व्हॉइस नोटच्या आधारे पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. परंतु वैष्णवीचा मृतदेह सापडेपर्यंत बराच उशीर झाला होता. पोलिसांनी वैष्णवीची ही बॉडी देखील शवविच्छेदनासाठी पाठवली आहे. अधिक तपास सुरु आहे.