मुंबई : 10 जानेवारीला अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला आमदार अपात्रता प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल घोषित केला. या निकालावर उद्धव ठाकरे Uddhav Thackeray गटाने तीव्र आक्षेप घेऊन काल सोमवारी कायदे तज्ञांच्या समवेत पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे गटाचे वकील ऍड.असीम सरोदे Adv. Aseem Sarode यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर Assembly Speaker Rahul Narvekar यांच्यावर आणि त्यांनी घोषित केलेल्या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवून म्हटले आहे की, ‘ही कायदेविरोधी प्रवृत्ती तयार होत आहे, त्याबद्दल या जनतेच्या न्यायालयात बोललं गेलं पाहिजे…!’
या पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांशी बोलताना ऍड. असीम सरोदे म्हणाले की, ” 10 जानेवारी 2024 चा निर्णय पाहता त्याची चिरफाड आवश्यक आहे. या निर्णयातून लोकशाही कशी मारली जाते हे सुद्धा दिसते. चूक कोण आणि बरोबर कोण हे ठरवत असताना एक बाजू घेणं आवश्यक आहे आणि ती सत्याची बाजू असली पाहिजे. त्यांनी सांगितले की, विधिमंडळ पक्ष तयारी अस्थायी स्वरूपाची व्यवस्था आहे आणि म्हणून कायद्यामध्ये विधिमंडळ पक्षाला महत्त्व नाही.”
सरोदे म्हणाले कि ,” जो मूळ राजकीय पक्ष आहे त्याला महत्त्व आहे. आपल्या बाबतीत पाहायचं असेल तर मूळ राजकीय पक्ष शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला आहे. त्यांच्या सहीने रजिस्ट्रेशन झाले आणि त्यामुळे मूळ राजकीय पक्ष हा पक्ष चालवेल, विधिमंडळ पक्ष हे आमदार म्हणून निवडून आलेल्या लोकांचा पक्ष आहे. त्याच्यावर सुद्धा नियंत्रण ठेवण्याचे सगळं कायद्यानुसार हे मूळ राजकीय पक्षाला आहे.
पक्ष सोडला असेल तर ते दुसऱ्या राजकीय पक्षांमध्ये त्वरित विलीन होऊ शकतात – ऍड.असीम सरोदे
” पक्ष सोडला असेल तर ते दुसऱ्या राजकीय पक्षांमध्ये त्वरित विलीन होऊ शकतात. आपला गट स्थापन करून त्या गटाला गट म्हणून मान्यता राजकीय गट म्हणून मान्यता मिळवून नंतर एखादा राजकीय पक्ष काढू शकतात. पण एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेल्या आमदारांनी विलीन झालेले नाहीत. ते आम्हीच शिवसेना म्हणत आहेत. आणि त्यामुळे ते अपात्र ठरतात हे राहुल नार्वेकर यांनी निर्णय देण्याच्या पूर्वीची सगळी परिस्थिती त्यांनी अभ्यासली नाही. दुसरी गोष्ट दोन तृतीयांश लोक जर बाहेर गेले तर त्यांना संरक्षण मिळू शकते.”