क्रीडा विश्वातून चांगली बातमी : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा रोज नवनवे विक्रम रचत आहे. अशातच रोहित शर्मा इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रविवारी अफगाणिस्तानविरुद्धचा दुसरा टी-20 सामना खेळला आहे. या दरम्यान रोहितने इतिहास रचला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 सामने खेळणारा रोहित शर्मा हा जगातील पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे.

- रोहितनंतर टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत आयरिश फलंदाज पॉल स्टर्लिंगचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- पॉलने 134 सामने खेळले आहेत.
- त्याच्यानंतर आयरिश खेळाडू जॉर्ज डॉकरेलय याने 128 सामने खेळले आहेत.
- पाकिस्तानचा फलंदाज शोएब मलिक चौथ्या स्थानावर आहे. शोएबने 124 सामने खेळले आहेत.
- न्यूझीलंडचा खेळाडू मार्टिन गप्टिल पाचव्या क्रमांकावर आहे. गप्टिलने 122 सामने खेळले आहेत.
- विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर तो या यादीत 10 व्या स्थानावर आहे. कोहली आपला 116 वा सामना खेळत आहे.