मुंबई : सध्या महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळलेलं असताना एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. काही वेळापूर्वीच एका व्यक्तीने फोन करून पोलीस कंट्रोल रूमला police control room माहिती दिली आहे की, मुंबईतील उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा घातपात करणार असल्याचं काही जण बोलत असल्याचं या व्यक्तीने ऐकलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये काही जण उर्दू भाषेमध्ये बोलत होते. ज्या व्यक्तीने फोन करून ही माहिती दिली आहे. त्या व्यक्तीच्या सांगण्यानुसार हे लोक मुंबईतील उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री बाहेर काहीतरी घातपात करणार आहेत असे असल्याचे या व्यक्तीचे म्हणणे आहे. त्याचबरोबर भायखळ्यातील मोहम्मद अली रोडवर खोली भाड्याने घेण्याबाबत देखील संदर्भ असल्याचं या व्यक्तीचं म्हणणं आहे. दरम्यान या फोन नंतर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.