नाशिक : आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी PM NARENDRA MODI यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. नवी दिल्ली मधून वायुदलाच्या खास विमानाने ओझर विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी प्रधान सचिव नितीन करीर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप हे उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा दौरा
आज सकाळी नवी दिल्लीतून वायुदलाच्या खास विमानाने ओझर विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले. दरम्यान नाशिकमध्ये रोडशो आणि काळाराम मंदिरमध्ये दर्शन पंतप्रधान मोदी यांनी घेतले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्त्व असल्याचं बोललं जात आहे.
https://www.facebook.com/share/v/EcGaqWmVmuWyhV6r/?mibextid=qi2Omg
नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो नंतर गोदावरी नदीची आरती आणि जलपूजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावेळी पुरोहित संघाच्या वतीने चांदीचा कुंभ आणि पगडी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पंतप्रधानांनी काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेतले दर्शन घेतले.