Flying Car : हवेत उडणाऱ्या गाड्या ही आता केवळ कल्पना उरली नसून लवकरच अशा गाड्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अमेरिकेच्या फेडरल एव्हीशन ऍडमिनिस्ट्रेशन या सरकारी यंत्रणेने उडणाऱ्या गाडीला मान्यता दिली आहे. अमेरिकेतील एलेफ एरोनॉटिक्स या कंपनीने तयार केलेल्या फ्लाईंग कारला अमेरिकन सरकारकडून मान्यत मिळाली असल्याची घोषणा या कंपनीने केली आहे. त्यामुळे फ्लाईंग कार आता केवळ सिनेमापुरत्या मर्यादित राहिल्यानसून पुढच्या काही वर्षात प्रत्यक्षात सर्वत्र उडताना दिसू शकतात.
कशी आहे फ्लाईंग कार?
अमेरिकेतील ‘एलेफ एरोनॉटिक्स’ या कपंनीने तयार केलेल्या फ्लाईंग कारला ‘मॉडेल ए’ असं नाव देण्यात आलं आहे. कंपनीने २०१६ मध्ये पहिल्यांदा या कारचं प्रोटोटाईप तयार केलं होतं. ही कार रस्त्यावर चालु शकते तसेच एखाद्या हेलिकॉप्टर सारखंच व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग देखील करु शकते.
अमेरिकन सरकारच्या फेडरल एविशन ऍडमिनिस्ट्रेशन (FAA) ने नुकतंच कंपनीला विशेष वायूयोग्यता प्रमाणपत्र दिले आहे. एलेफ एरोनॉटिक्स कपंनीने दिलेल्या माहितीनूसार, कंपनीच्या ‘Model A’ या कारला युएस फेडरल एविएशन ऍडमिनिस्ट्रेशनकडून मान्यता मिळाली आहे. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे कारण पहिल्यांदाच अमेरिकेत अशा प्रकारच्या वाहनाला मंजुरी देण्यात आली आहे. पूर्णपणे रस्त्यावर उतरण्यासाठी या फ्लाईंग कारला नॅशनल हायवे अँड ट्राफिक सेफ्टी ऍडमिनिस्ट्रेशनची परवानगी मिळणे देखील आवश्यक आहे.
फ्लाईंग कारची वैशिष्ट्ये काय आहेत? (Features of Model A Flying Car)
कपंनीच्या वेबसाईट नुसार, ही फ्लाईंग कार पूर्णपणे इलेक्ट्रिकल आहे. या कारच्या सहाय्य्यने रस्त्यावर सहजपणे टेकऑफ आणि लँडिंग करणे शक्य आहे. या कारमध्ये एक किंवा दोन प्रवासी प्रवास करू शकतात. अमेरिकेतील ग्रामीण आणि शहरी दोन्ही रस्त्यांवर ही कार चालवता येईल. या फ्लाईंग कारला पार्क करण्यासाठी वेगळी पार्किंग किंवा गॅरेजची गरज नाही. ही कार अन्य कारसाठी असणाऱ्या पार्किंगमध्ये पार्क होऊ शकते.
Model A फ्लाईंग कार एकदा चार्ज केल्यानंतर ३२१ किमी प्रवास करु शकते, असा कंपनीचा दावा आहे. तसेच हवेत उडवल्यास १७७ किमी पर्यंत यातुन प्रवास करता येऊ शकतो. विशेष म्हणजे Model A कार जमिनीवर साधारणपणे 40 किमी प्रतितासापेक्षा जास्त वेगाने धावू शकत नाही. अमेरिकेत अश्या स्वरूपाचे वाहन प्रमाणित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
फ्लाईंग कारची किंमत किती आहे? (Cost of Model A Flying Car)
मॉडेल ए कारची किंमत तब्बल 3 लाख डॉलर इतकी आहे. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत तब्बल 2.5 कोटी रुपये इतकी आहे. सध्या या कारसाठी प्री-बुकिंग सुरु आहे. १५० डॉलर भरुन ही कार अमेरिकेतील ग्राहकांना बुक करता येणार आहे.
फ्लाईंग कार कधीपर्यंत बाजारात येईल?
साधारणतः 2025 या वर्षाच्या अखेरीस ‘मॉडेल ए’ कार ग्राहकांना वितरित करण्याचे अलेफ एरोनॉटिक्स या कंपनीचे उद्दिष्ट आहे. भारतामध्ये मात्र अद्याप अशा प्रकारच्या कारला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे भारतीय ग्राहकांना फ्लाईंग कारसाठी आणखी बराच काळ वाट पाहावी लागणार आहे.