पुणे : पुण्याच्या येरवडा कारागृहातून पुन्हा एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कारागृहातील कैद्यांच्या टोळक्याने एका कैद्याची हत्या Prisoner Murder केल्याचं उघडकीस आला आहे. या घटनेनंतर सध्या ससून मध्ये कैद्याच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला आहे. जोपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही असं नातेवाईकांनी सांगितला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळची ही घटना आहे. येरवडा कारागृहात असलेला कैदी नामे महेश चंदनशिवे याच्यावर पूर्व-वनस्यातून कारागृहातील चार ते पाच कैद्यांनी हल्ला केला. कात्री आणि धारदार हत्याराने महेश चंदनशिवे यांच्या मानेवर वार केल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान शवविच्छेदनासाठी मृतदेह ससूनमध्ये आणण्यात आला आहे.

सध्या या ठिकाणी महेश चंदनशिवे याचे कुटुंबीय आणि नातेवाईकांचा संतप्त जमाव संबंधित पोलिसावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही असा आक्रमक पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे.










