मुंबई : गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रानं राजकारणामध्ये मोठी उलथा पालथ पाहिली आहे. त्यामुळे कधी काय होईल हे सांगता येत नाही. आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्या वर्षा निवासस्थानी मनसे प्रमुख राज ठाकरे MNS chief Raj Thackeray यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. ही भेट खरंतर विकासात्मक विषयांवर चर्चा करण्यासाठी होती. परंतु आत्तापर्यंत मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यामध्ये अनेक वेळा भेटी झाल्यामुळे यात राजकीय विषय देखील चर्चेत होता. असं बोललं जात आहे.
आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. या भेटीबाबत असं सांगण्यात आलं आहे की, मराठी पाट्या, टोल वसुली, धारावी पुनर्वसन आणि इतर मुंबईतील विकास कामांसह राम मंदिर या विषयावर देखील या बैठकीमध्ये चर्चा पार पडली आहे. दरम्यान या सातत्याने होणाऱ्या बैठकांमुळे राजकीय वर्तुळातून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. तर या बैठकीमध्ये राजकीय विषयावर देखील चर्चा करण्यात आली असल्याचं दबक्या आवाजात बोललं जात आहे.