Maharashtra Agriculture Day 2023 : वसंतराव फुलसिंग नाईक यांच्या प्रयत्नांना मान्यता देण्यासाठी महाराष्ट्रात 1 जुलै ते 7 जुलै हा कृषी सप्ताह पाळला जातो. कृषीविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल, याकडे वसंतराव नाईक यांनी लक्ष दिले होते.
कृषी दिन 1 जुलैला साजरा केला जातो. हरित क्रांतीचे जनक वसंतराव फुलसिंग नाईक यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणूनही ओळखला जातो.
महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे. कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी मदत करणाऱ्या वसंतराव फुलसिंग नाईक यांच्यासाठी राज्यात 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत कृषी सप्ताह पाळला जातो. हा दिवस शेतकऱ्यांच्या समर्पणाचा आणि राज्यभरातील कृषी पद्धतींना चालना देण्यासाठी त्यांच्या योगदानाचा सन्मान करतो.
देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठीच केंद्र आणि राज्य शासन यांच्यावतीने कृषी क्षेत्राच्या विकासासंदर्भात विविध योजना कार्यरत आहे.
पीएम-किसान योजना
पीएम किसान ही केंद्र सरकारची 100% निधी असलेली योजना आहे. 1 डिसेंबर 2018 पासून ही योजना सुरू झालीये. योजनेंतर्गत, सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना तीन समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्ष 6,000/- उत्पन्नाचा आधार दिला जातो. योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले अशी आहे. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मदतीसाठी पात्र असलेल्या शेतकरी कुटुंबांची ओळख पटवेल.
हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.
पीएम किसान मानधन योजना
ही योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जाते, ज्यामध्ये वयाच्या ६० वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळते. या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर याआधी तुम्हाला तुमच्या वयानुसार प्रीमियम भरावा लागेल. १८ ते ४० वर्षे वयोगटातील यामध्ये अर्ज करू शकता, जर तुमचे वय १८ वर्ष असेल तर तुम्हाला दरमहा ५५ रुपये प्रीमियम भरावा लागेल.
वसंतराव फुलसिंग नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले होते. अहवालानुसार, वसंतराव फुलसिंग नाईक यांच्या राजवटीत राज्यात अनेक कृषी विद्यापीठे आणि संस्थांची स्थापना झाली. तुम्ही महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्ताने तुमच्या प्रियजनांना खाली दिलेल्या शुभेच्छा पाठवा.
१. आपल्या सर्वांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अन्नाचा अधिक आदर करूया, शेतक-यांचा अधिक सन्मान करूया.
२. आपल्या शेतकर्यांमुळे, आम्हाला आमच्या आहारात कमतरता भासत नाही आणि असंख्य प्रक्रिया केलेले आणि अनहेल्दी अन्न खावे लागत नाही, त्यासाठी शेतकऱ्यांचे आभार.
३. कृषी दिन हा दिवस आहे की आपण रात्रंदिवस मेहनत केल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे आभार मानावेत कारण आपल्याला खायला चांगलं अन्न मिळतंय.
४. शेतीतूनच आपल्याला शक्ती मिळते. महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा.