मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी Lok Sabha Elections सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच आता सत्ताधाऱ्यांचा गोटातून मोठी बातमी समोर येते आहे. शिवसेनेतून Shivsena फुटून एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी भाजपशी BJP हात मिळवणी करून सत्तेचं भागीदार झाले. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून फुटून सत्ताधाऱ्यांच्या गोटात स्माईल झाले. सध्य परिस्थितीत भाजप, शिवसेना ( शिंदे गट ), राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) हे महाराष्ट्रात सत्तेत आहेत. दरम्यान शिवसेना शिंदे गटाला जेव्हढ्या जागा लोकसभेसाठी दिल्या जातील तेवढ्याच जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला देण्यात याव्यात अशी मागणी अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांच्या गोटात देखील कोणत्या जागा निवडून येण्यासाठी कोणाला उमेदवारी द्यावी यादृष्टीने बैठका सुरु आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहिती नुसार, अजित पवार गटाने सामान जागा वाटपासाठी आग्रह धरला आहे त्यामुळे भाजपपुढे आता कोणाचे कसे मन राखावे असा पेच निर्माण झाला आहे. यावर आता भाजप काय तोडगा काढते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अमित शहा यांच्या सोबत नवीन वर्षात होणार जागावाटप संदर्भात बैठक
महायुतीत भाजपचे 105 आमदार आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे यांचे 50 पेक्षा जास्त आमदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पक्षाचे 43 आमदार आहेत. नवी वर्षात जानेवारी महिन्यात जागा वाटपासंदर्भात अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार असल्याचे समजते. जानेवारी महिन्यात आमची महाराष्ट्रातल्या घटक पक्षांची बैठक होईल आणि त्यानंतर भाजप श्रेष्ठींसोबत एकनाथ शिंदे आणि आमच्या पक्षाचे नेते मिळून बैठक करतील आणि जागावाटप निश्चित होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल म्हणाले आहेत. आम्हीही सत्तेत सामान वाटेकरी आहोत, त्यामुळे आम्हालाही सामान जागा मिळाव्यात अशी भूमीका अजित पवार गटाची आहे. त्यामुळे या बैठकीनंतर खुद्द अमित शहा काही तोडगा काढू शकतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.