जालना : जालना शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस येथे आहे. जालन्यातील गांधीनगर परिसरात इब्राहिम खान (वय वर्ष 60) हे त्यांच्या स्वतःच्या घरात राहत होते. त्यांच्या घरात त्यांचा मुलगा शाहरुख खान हा रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. पण काही दिवसांपासून पिता-पुत्रांमध्ये सातत्याने भांडण होत होतं. आणि या भांडणाच कारण होतं ते राहतं घर विकले जावं अशी मुलाची इच्छा होती. पण राहत घर विकण्यास वडिलांनी ठामपणे या गोष्टीला विरोध चालू ठेवला.
ज्या दिवशी हत्या झाली त्यादिवशी पुन्हा एकदा या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. आणि आरोपी मुलगा शाहरुख खान यांनी संतापाच्या भरात वडिलांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जबर वार केला. आणि यातच वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलगा शाहरुख खान यास पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आणि त्याचबरोबर आजच्या नात्यांमध्ये न राहिलेली प्रेमाची भावना अशा क्रूर घटनेला जन्म देते असेच दिसून येते आहे.